५०-५० च्या फॉर्म्युल्यावर निर्णय न झाल्यास सर्व पर्याय खुले – उध्दव ठाकरे

0
455

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – भाजप-शिवसेना युतीतील ५० – ५० च्या फॉर्म्युल्यावर निर्णय झाल्यावरच सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल. सत्ता स्थापनेची घाई नाही, मात्र सर्व पर्याय खुले आहेत,  हा इशारा वगैरे नाही, पण जे ठरले होते, त्याची आठवण करून नक्की देणार आहे,  सत्तेची हाव माझ्या डोक्यात नाही, असा सुचक इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.    

ठाकेर म्हणाले की, जागावाटपाच्या वेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊन मी कमी जागा स्वीकारल्या आहेत. पण त्यांच्या अडचणीत वाढ होत असेल. तर मी सगळ्या अडचणी समजून घेऊन शकत नाही. आता अत्यंत पारदर्शकपणे आता दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करू. भाजपाध्यक्ष अमित शहा येतील, मग आम्ही चर्चा करू, असेही ठाकरे म्हणाले.

जेंव्हा राज्यकर्त्यांचे डोळे बंद होतात तेव्हा जनता डोळ्यात अंजन टाकते. सगळ्यांचे डोळे उघडले,  म्हणून त्याचे आभार मानतो. पक्ष बदलणाऱ्यांना पराभूत केले हे सगळ्यात मोठे काम जनतेने केले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आदित्यच्या विजयाबाबत बोलताना ते म्हणाले की, आईवडील म्हणून आम्हाला आदित्यचा अभिमान आहे.  मी यासाठी जनतेसमोर नतमस्तक होतो. हे आशीर्वाद कायम असू द्यात, असेही ते म्हणाले.