२०१४ मध्ये भाजप ब्लँकेट ओढून झोपला होता का? ; संजय राऊतांचा खोचक सवाल

0
537

पंढरपूर, दि. २४ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपशी युती करणार का ?  या प्रश्नावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले की, २०१४ मध्ये शिवसेनेलाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती व्हावी, असे वाटत होते. मग त्यावेळी भाजप ब्लँकेट ओढून झोपला होता का? आम्ही अजूनही २०१४ मध्ये भाजपने असे का केले, याची कारणे शोधत आहोत. तसेच भाजपशी समेट करायला आम्ही काही पासवान नाही, असा टोला राऊत यांनी  लगावला.