२००५ च्या पुरावेळी जिथे पाणी आले, ती पातळी आपण ग्राह्य धरली ही चूक झाली – शरद पवार

0
358

कोल्हापूर, दि. १४ (पीसीबी) – २००५ साली जिथपर्यंत पाणी आले होते, ती पातळी आपण ग्राह्य धरली ही चूक झाली असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पवार कोल्हापूरला आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, आता पुरावर कायमचा उपाय केला पाहिजे. पूर ग्रस्तांना नवीन घरे बांधून दिली पाहिजेत, जी टिकाऊ असतील. लातूरला भूकंप झाला त्यावेळी आम्ही एक लाख घरे बांधली होती. आता तसा निर्णय घेतला पाहिजे, असे पवार म्हणाले. काही गावेही हलवावी लागतील, असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जाला सरकारकडून पूर्ण माफी दिली पाहिजे. उस उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन बेणे घेऊन उसाची लागवड केली पाहिजे. ज्यांना नवीन लागवड करायची आहे त्यांना नवीन बेणे देण्याची व्यवस्था केली पाहिजे, असे पवार म्हणाले.

तसेच मजुरांसाठी रोजगार हमी किंवा कोणत्याही मार्गाने रोजगार देणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी पूरग्रस्त भागात डॉक्टर पाठवले आहेत. घरे बांधणीत देखील मदत करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.