हॉलिवूडमध्ये पैशांसाठी भीक मागावी लागत नाही- राधिका आपटे

0
467

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने तिच्या हॉट लूक आणि अभिनयाने अनेकांना भूरळ घातली आहे. राधिकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. ती लवकरच ‘लिबर्टे: कॉल टू स्पाय’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासंबंधात राधिकाने मीडियासह संवाद साधला. दरम्यान तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील फरक आधोरेखीत केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी झालेल्या एका मुलाखतीमध्ये राधिकाला हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये काम करण्यात काय फरक जाणवतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राधिकाने ‘तेथील लोक त्यांच्या कामाबाबत वक्तशीर आहेत आणि ते लोक वेळेत पैसे देतात. तेथे पैशांसाठी कोणाकडे सतत भीक मागावी लागत नाही’ असे उत्तर दिले आहे.

‘लिबर्टे: कॉल टू स्पाय’ या चित्रपटात राधिका ब्रिटीश गुप्तहेर नूर इनायत खानच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच राधिका या चित्रपटासाठी फार मेहनत घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे ‘द वेडिंग गेस्ट’ या बॉलिवूड चित्रपटात अभिनेता देव पटेलसह दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्यांचा सेक्स सीन लीक झाला होता. त्यावर राधिकाने या सीनमध्ये पुरुष कलाकार असूनही तिच्या नावे हा सीन लीक झाल्याने खंत व्यक्त केली होती.