हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजेपर्यंत सुरू

0
598

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे..

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे.

मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ तूर्तास बंदच राहणार आहेत.

दरम्यान, धार्मिकस्थळे बंदच ठेवण्यात येणार असल्याने भाजपाने जोरदार टीका केली आहे. श्रावण, भाद्रपद हे महिने हिंदूंच्या सणांचे म्हणून ओळखले जातात. गतवर्षी सर्व सण घरातच साजरे करावे लागले, आता याही वर्षी त्याच पद्धतीने सणसूद करायची का, असा सवाल विचारला जातो आहे.