हिस्सा देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक, डॉक्टर विरोधात गुन्हा..

0
182

पुणे, दि. ४ (पीसीबी) : मेडिकलसाठी भाड्याने गाळा व नफ्यात हिस्सा देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य हॉस्पिटल, चापेकर चौक, चिंचवडगाव या ठिकाणी 11 नोव्हेंबर 2019 ते 2 सप्टेंबर 2021 दरम्यान हा प्रकार घडला.याप्रकरणी किरण दत्तात्रय कोठावदे (वय 37, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि.03) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. वसंत गंगाधर आणेराय (वय 40, रा. माधवनगर, धानोरी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना मेडिकलसाठी गाळा भाड्याने देण्याचे व त्यामध्ये होणा-या नफ्यात हिस्सा देण्याचे आमिष दिले. त्याबदल्यात फिर्यादी यांच्याकडून दहा लाख रूपये घेतले. फिर्यादी यांनी अनेकदा मागणी करूनही आरोपीने पैसे दिले नाहीत. तसेच, गाळाही दिला नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.