हिंदू धर्म तोडण्यासाठी कटकारस्थाने; मोहन भागवतांचा आरोप

0
581

प्रयागराज, दि. ३१ (पीसीबी) – हिंदू धर्म तोडण्यासाठी कटकारस्थाने शिजवून भारताचे तुकडे करण्याचा नवीन बेत आखले जात आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी  प्रयागराज येथे आयोजित केलेल्या धर्मसंसदेत आज (गुरूवार) केला.  

प्रयागराजला सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये विश्व हिंदू परिषदेने धर्म संसदेचे आयोजन केले आहे. या संसदेत बोलताना मोहन भागवत म्हणाले की, शबरीमलाच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मात्र, कोणत्याच हिंदू महिलांना मंदिरात दर्शनाला जायची इच्छा नाही. तेव्हा काही गट श्रीलंकेतून महिलांना आणून मंदिरात घुसवत आहेत. या गटांना हिंदू धर्मात स्त्री-पुरुषांमध्ये फूट निर्माण करायची आहे. त्यासाठी विविध कट रचले जात आहेत, असा आरोप  भागवतांनी यावेळी केला.

देशातील काही संघटनांना देश तोडायची इच्छा आहे. त्या संविधानाचा विरोध करतात. मात्र, केरळचा हिंदू समाज यांच्याविरोधात आंदोलन करत आहे. तो आता त्यांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. तसेच  जात-पात, भाषा,रंग सोडून हिंदूंनी एकत्र यावे, असे आवाहनही  त्यांनी केले.