हिंजवडीत महिला रिक्षा स्टॅन्ड

0
477

हिंजवडी, दि. १० (पीसीबी) – क्रांती रिक्षा सेनेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील पहिले महिला रिक्षा स्टँड सुरू करण्यात आले. रिक्षा स्टँड ला अहिल्याबाई होळकर रिक्षा स्टँड असे नाव देण्यात आले. क्रांती रिक्षा सेनेचे अध्यक्ष श्रीधर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सेनेच्या महिला शहराध्यक्ष कविता मैदाड यांनी ही संकल्पना सत्यात उतरवली. रिक्षा स्टँड च्या बोर्ड चे उदघाटन विजयाताई वाकडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला शिकली सुधारली तर कुटूंब सुधारते त्याप्रमाणे जर रिक्षा व्यवसायांत महिलांचा सहभाग वाढला तर अनेक कुटूंब उभी राहू शकतात.व रिक्षा व्यवसायाला देखील शिस्त लागेल अशी भूमिका क्रांती रिक्षा सेनेचे अध्यक्ष श्रीधर काळे यांनी याप्रसंगी केली.या कार्यक्रमास शंकर वाकडकर ,कैलास जोगदांड , डॉ देवराम मैदाड शिमिता शिरसाठ ,यशोदा मोतीरावे,सिधुबाई साठे, परमेश्वर तोरमल , नितीन कुंभार , विलास सोनोने , महोन हिरेमनी , जालिंदर घायाळ , योगेश कुंभार चिदानंद कौलगी , पृथ्वीराज सपकाळ व सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला अध्यक्ष कविता मैदाड , वंदना वेताळ , संगीता कांबळे यांनी जबाबदारी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब आखाडे यांनी केले.