शुक्रवारी दंत वैद्यांच्या राष्ट्रीय संपात पिंपरी चिंचवड शाखेचा सहभाग – डॉ. यशवंत इंगळे

0
194

आयुर्वेदिक चिकित्सकांना दंत शल्यक्रिया करण्यास दंतवैद्यांचा विरोध

पिंपरी, दि.9 (पीसीबी) – केंद्रीय आयुष मंत्रालयाने मागील महिन्यात आयुर्वेदिक चिकित्सकांना दातांशी संबंधित शस्त्रक्रिया तसेच हाडांचे आजार, डोळ्यांचे आजार, नाक, कान, घसा याचे उपचार व शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. याला इंडियन डेंटल असोसिएशनचा तीव्र विरोध आहे. आपला विरोध केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि. 11 डिसेंबर) राष्ट्रीय संप पुकारण्यात आला आहे. या संपात इंडियन डेंटल असोसिएशनचे पिंपरी चिंचवड शाखेचे सर्व दंत शल्य चिकित्सक सहभागी होणार आहेत. अशी माहिती आयडीए, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. यशवंत इंगळे,सचिव डॉ. संदिप भिरुड, खजिनदार डॉ. सुमंत गरुड यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

डॉ. इंगळे म्हणतात, केंद्र सरकारने आयुर्वेद डॉक्टरांना हाडांचे आजार, डोळ्यांचे आजार, नाक, कान, घसा, आणि दातांशी निगडीत शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आयुर्वेद डॉक्टर विरुद्ध ॲलोपॅथी डॉक्टर असे चित्र निर्माण झाले आहे. सर्व पॅथीमध्ये रुग्ण हा प्रथम दूवा असतो. रोगाचे योग्य निदान उपचार आणि रुग्णसेवा हा त्याचा प्रमुख्य घटक असतो. वैद्यक शास्त्रातील नीतिमूल्य आणि नैतिकता ती सगळीकडे सारखीच असते. आयुर्वेद हे भारताला लाभलेले वरदान आहे. आयुर्वेदाचार्य शल्यविशारद वैद्य सुश्रुत हे शस्त्रक्रियेतील जागतिक पातळीवर महागुरू जनक समजले जातात आणि त्याचा सगळ्या भारतीयांना खूप अभिमान आहे.

भारतात वैद्यकीय निरक्षरतेचे प्रमाण खूप जास्त आहे. तज्ञ लोकांनादेखील कुठल्या डॉक्टरकडे कुठल्या आजारासाठी जावे याची पुर्ण माहिती नसते. वैद्यकीय क्षेत्राची अशी अवस्था आहे तर, दंतवैद्यकीय शास्त्राबद्दल बरेच अज्ञान आहे. वैद्यकीय शास्त्रासह दंत शास्त्रात खूप प्रगती झाली आहे. दंतवैद्य शास्त्र हे पाश्चिमात्य संस्कृतीतून भारतात आले आहे. पूर्वी भारतात दातांचे खूप आजार अस्तित्वात नव्हते वयोमानाप्रमाणे दात हलणे आणि गळून पडणे हा आजार प्रामुख्याने होता. भूले वीना दात काढणे हा उपचार नसून प्राचीन काळात शिक्षेचा भाग मानला जायचा. पाश्चात्य संस्कृतीने आपल्या राहणीमानात आहारात बराच बदल केला. दातांविषयी जागरूकता, ब्रश करणे, टूथपेस्ट वापरणे हे तिथून अस्तित्वात आले. दंत उपचार पद्धती, यंत्र प्रणाली, त्यात लागणारे साहित्य, त्याचे फायदे तोटे त्यासाठी लागणारे कौशल्य याचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम तयार झाला. भारतात 1948 च्या डेंटिस्ट ॲक्टनुसार नियम लागू झाले. दंतवैद्यक शास्त्र हे अतिशय कलात्मक, जैविक, यांत्रिक आणि ज्ञानाने परिपुर्ण असे शास्त्र आहे. त्याच्या आठ स्वतंत्र शाखा आहेत. दंतवैद्य शास्त्र शिकण्यासाठी बारावी नंतर नीटची परीक्षा दिल्यावर चार वर्ष इंटर्नशिपचे एक वर्ष आणि पदव्युत्तर तीन वर्ष असा स्पेशलायझेशनचा अभ्यास आहे. रुट कॅनल उपचार प्रणाली सर्जरी करून अक्कलदाढ काढणे इम्प्लांट बसवणे, हिरड्यांची सर्जरी, दाताचा कॅन्सर, दंत सौंदर्यशास्त्र, जबड्यांची सर्जरी कृत्रिम दंत शास्त्र, वेडेवाकडे दात सरळ करणे असे विविध अभ्यासक्रम दंत शास्त्रात येतात.

गेल्या तीस ते पस्तीस वर्षात भारतात दंत शास्त्र शाखेत खूप प्रगती झाली आहे. अद्यावत तंत्रज्ञान सतत नवनवीन अभ्यासक्रम आणि विकसित कौशल्य यामुळे दंत शास्त्राला भारतात बरीच मागणी आहे. त्यानिमित्ताने सरकारी कॉलेजेस पुरे पडेना मग खाजगी कॉलेजची भर सुरू झाली हळूहळू त्याचे प्रमाण इतके वाढले आज देशभरात तीनशेहून अधिक डेंटल कॉलेजेस आहेत. काहीजण स्वता:चा दवाखाना चालवतात तर काही पुढे शिकतात. काही नोकरी स्वीकारतात इतके होऊनही आज दीड ते दोन लाख डेंटिस्ट बेकार आहेत. ही तीव्र समस्या आहे. त्यात एमएस आयुर्वेदला दंत शल्यचिकित्सा करण्यास परवानगी दिली तर उपचारांचा सावळागोंधळ होईल, रुग्णांचे पण खूप नुकसान होईल. सरकारने आयुर्वेद आणि मॉर्डन डेंटिस्ट्री असे मिश्रण करू नये ही आयडीएची मुख्य मागणी आहे.