हात उसने दिलेले पैसे मागितल्याने महिलेचा विनयभंग

0
225

देहूरोड, दि. १३ (पीसीबी) – हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याने पाच जणांनी मिळून एका महिलेला शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून मारहाण केली. महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 11) रात्री देहूरोड येथे घडली.

सोहम साठे, रंजीना साठे, सुरज साठे आणि अन्य दोन जणांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रंजना साठे याच्या आईला फिर्यादी यांनी हात उसने पैसे दिले आहेत. ते पैसे परत मागितल्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी यांना घरात घुसून बुटाने मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी सोहम साठे याने पीडित महिलेसोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. यामध्ये पीडित महिलेला मुका मार लागला असून डाव्या डोळ्याखाली खरचटले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.