‘हमाम में सब नंगे…’ : खासदार संजय राऊत

0
324

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मुंडे यांना पूर्ण अभय मिळणार, असे संकेत आहेत.

हमाम में सब नंगे है, याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आम्ही नितीमत्ता सांभाळतो, आम्ही संयम पाळतो, नितीमत्ता आम्हाला कुणी शिकवू नये. पण नितीमत्ता तुम्ही किती पाळता याचा हिशोब करायला कुणी खातं-वही घेऊन बसलं, तर त्रास होईल, अशा इशारा संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला दिलाय. काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारण्याचा प्रयत्न करु नये, एखादा दगड तुमच्या घरावर बसला तर तुमचाही महाल कोसळून पडेल, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

हनिट्रॅप महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हता. पण अलिकडे ज्याप्रकारचं राजकारण गेल्या वर्षभरात चाललं आहे, चिकलफेक आणि बदनाम करण्याचं, त्यामध्ये वाढ झाली आहे. यात फक्त व्यक्तीची बदनामी नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची बदनामी होतेय, असं मला वाटतंय. म्हणून या सर्व विषया प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा तातडीने घेऊ नये, या मताचा मी सुद्धा आहे, असं राऊतांनी म्हटलंय.