हडपसरमध्ये आर्थिक देवाण घेवाणीतून मित्रानेच केला मित्राचा खून

0
1126

हडपसर, दि. १५ (पीसीबी) – आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१४) रात्री साडेदहाच्या सुमारास हडपसर येथील अंगुर वाइन्सजवळ घडली.

राहुल पाटील ( रा. हडपसर, मूळ जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्याच्या मित्रामध्ये आर्थिक देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता. त्यावरुनच सोमवारी रात्री हडपसरमधील अंगुर वाइन्स येथे राहुल आणि त्याच्या मित्राची बाचाबाची झाली. त्यानंतर मित्राने आणलेल्या चाकूने राहुलवर वार करुन खून झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हडपसर पोलीस तपास करत आहेत.