‘स्व. राजीव गांधी गौरव पुरस्काराने’ कोरोना योध्यांचा सन्मान

0
229

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) – राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ‘ऑल इंडिया मेडिकल सायन्स’ (AIMS) ची स्थापना करण्यात केंद्रातील कॉंग्रेस प्रणित सरकारने पुढाकार घेतला. देशातील वैद्यकीय सेवेसाठी व औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतात संगणक क्षेत्राची पायाभरणी केली. त्यांनी दुरदृष्टीने घेतलेल्या निर्णयामुळेच कोरोना या जागतिक महामारीवर देशभर सरकारी रुग्णालयातून रुग्णांना सेवा पुरविणे शक्य होत आहे. या धोरणातूनच माजी मंत्री स्व. रामकृष्ण मोरे यांनी पिंपरीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय उभारले. असे प्रतिपादन सचिन साठे यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस व चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस यांच्या वतीने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘स्व. राजीव गांधी गौरव पुरस्कार’ देऊन कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या योद्धांचा सन्मान पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 20 ऑगस्ट) करण्यात आला. यावेळी
डॉ. विजया आंबेडकर, रोहिदास बोऱ्हाडे, शशिकांत देवकांत, सुनीता खैरमोडे, सदानंद साबळे, कस्तुरी खैरमोडे, जागृती धर्माधिकारी, सुनील साठे, अदिती निकम, संतोष महामुनी, दिपक माकर आदींचा साठे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बोर्डे, युवक काँग्रेसचे सरचिटणीस कुंदन कसबे, विरेंद्र गायकवाड, प्रवक्ते गौरव चौधरी, विशाल कसबे, रोहित शेळके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजनात कुंदन कसबे यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन संदेश बोर्डे, आभार गौरव चौधरी यांनी मानले.