स्पाईन रोड चौकात टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

0
719

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – भरधाव पीकअप टेम्पोने दुचाकीस्वार तरुणीला दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार (दि.३०) सकाळी साडेदहाच्या सुमारास न्यु पुना बेकरी जवळील स्पाईन रोड चौकात घडली.

किरण नाथा चव्हाण असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज प्रकाश धुमाळ (वय २८, रा. साईकृपा निवास, ओमसाई कॉलनी, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात पीकअप टेम्पोचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास किरण आणि महेश हे दोघे तिच्या मोपेड दुचाकी (क्र. एमएच/१४/डीजी/४३१०) वरुन न्यु पुना बेकरी जवळील स्पाईन रोड चौकातून जात होते. यावेळी भरधाव पीकअप टेम्पोवरील अज्ञात चालकाने तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये किरण हीचा मृत्यू झाला. तर टेम्पो चालक टेम्पोसह फरार झाला आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.