…तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचे नांव पुढे येऊ शकते – सुब्रमण्यम स्वामी

0
623

नवी दिल्ली,  दि. २ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने २३० किंवा २२० जागा जिंकल्या आणि एनडीएच्या मित्रपक्षांना ३० जागा मिळाल्या. तर हा आकडा २५० पर्यंत पोहचेल. तरीपण  एनडीएला  ३० जागांची गरज  भासेल, असे वेळी या जागा मिळवण्यासाठी सर्व मान्य म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नांव पंतप्रधानपदासाठी पुढे केले जाईल, असे सुचक विधान भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.

या एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी यांनी हे विधान केले आहे.  एनडीएला कमी जागा मिळाल्यास   मोदी पंतप्रधान बनतील का? या प्रश्नावर स्वामी म्हणाले, हा निर्णय एनडीएमधील इतर मित्रपक्षांवरही अवलंबून असेल. ३० अथवा ४० जागांचे असणारे मित्रपक्ष यांनी समर्थन दिले नाही. तर मोदी पंतप्रधान बनू शकणार नाहीत. मात्र पंतप्रधान मोदींना नितीन गडकरी चांगला पर्याय ठरू शकतील, असे मत स्वामी यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही  पंतप्रधानपदावर  मोदी यांचीच पुन्हा  वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र,  आता पंतप्रधान पदाबाबत भाजपमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  गडकरी हे पंतप्रधान म्हणून मोदींना उत्तम पर्याय ठरू शकतात, असे सुचक विधान  सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.