सोनू सूदचे ट्विट डिलीट का होतात ?

0
275

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – परप्रांतिय मजुरांना स्वखर्चाने त्यांच्या घरी पोचवणारा सोनू सूद हा सद्या राजकीय चर्चेचा विषय झाला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनू सूद म्हणजे कोणी देवदूत नाही, असे म्हणत त्याला भाजपचे पाठबळ, हे भाजपचे प्यादे आहे आणि केवळ राज्य सरकार अपयशी ठरले हे दाखविण्यासाठीच हा खटाटोप आहे, असे म्हणत सोनू सूदवर टीका केली. दै.सामना च्या रोखठोक सदरात राऊत यांनी केलेले हे भाष्य जनतेला पटले नाही. सोशल मीडियातून राऊत अक्षरशः ट्रोल झाले. विशेष म्हणजे त्यानंतर सोनू सूदच्या ट्विटरवरचे ट्विट एक एक करत डिलीट करण्यात आलेत. त्यामुळे आता संशयाची सुई सोनू सूदकडे वळाली आहे.

सोनू सूदच्या विषयावर राज्यात राजकारण पेटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी सोनू सूदला बोलावून त्याच्या पाठीवर शाब्बसकीची थाप दिली. देशभरातील नागरिकांकडून सोनू सूद याच्या कार्याबद्दल वाहव्वा झाली. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्तींना सर्वतोपरी मदत केली म्हणून सोनूवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. बिहारमध्ये त्याचा पुतळा उभारायचीतयारी झाली.

त्याच्या कार्याची दखल, त्याचा आदर्श सर्व राज्यकर्त्यांनी घ्यावा असाही सूर आळवला गेला. सोनू सूद कानामागून आला अन् तिखट झाला अशी अवस्था झाली. त्यानंतर इतका पैसा सोनूकडून कुठून आला याची खोदाई सुरू झाली. एक सर्वसामान्य व्यक्ती नंतर चित्रपटातील व्हिलन आणि आता जनतेचा हिरो झालेला सोनू सूद किती कमावतो, त्याची मालमत्ता किती असे सुरु झाले.
दरम्यान, राऊत यांनी सोनूवर प्रहार करताच सोनूकडे मदत मागणाऱ्यांनी जे ट्विट केले होते ते एक एक करत डिलीट केले जात आहेत. आम्हाला आमच्या गावाला जायचे आहे, मदत करता का, अशी मदत मागणाऱ्यांनी अचानक हे ट्विट डिलीट केल्याने आता वेगळीच चर्चा रंगली आहे. सोनू सूद यांच्याकडे मदत केली की लगेच मदत मिळत होती. जे दत मागत होते त्यांना प्रतिसाद देत, `आप लोक वही रहो, खाना भेजा जायेगा` असे उत्तर सोनू सूद देत असे. एकापाठोपाठ हे चट्विट डिलीट केले जात असल्याने संशय बळावला आहे. आता सोनू सूद पुन्हा नव्या वादाचा विषय होऊ पाहतो आहे.