सूनेचे विवाहबाह्य संबंध होते

0
818
मुंबई, दि.३ (बीपीसी) – सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यावर विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केले.
विद्या चव्हाण म्हणाल्या, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सूनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य काही बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आमच्या निदर्शनास आले. माझ्या मुलाने यासंदर्भातील सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकाराची आम्हाला कल्पना दिली. त्यांनी घटस्फोटासाठी वकीलांशी संपर्कदेखील साधला होता,” अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
“नवरा बायकोच्या वादात मला भोवण्यात आलं. दुसरी मुलगी झाली म्हणून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही दुसऱ्या मुलीलाही तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे, असं त्यांनी यावेळी सांगितले. मी कायम महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. कायदा दुधारी शस्त्र आहे. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. परंतु कोणी त्याचा चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. कायदेशीर मार्गाने हा लढा सुरूच राहिल,” असेही त्यांनी नमूद केले.