सुशांत सिंह प्रकरणात माध्यमांची अवस्था वारांगनांपेक्षा वाईट – एक पत्रकार; तुमचे मत काय ?

0
378

वाचकहो, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे दळण गेले अडिच महिने इलेट्रॉनिक्स माध्मयांतून सुरू आहे. प्रिंट वाले शहाणे म्हणून त्याला जशास तशी जागा दिली. देशातील प्रेक्षक सुशांत सिंह प्रकऱणातील बातम्या, राजकारण, ब्रेकींग न्यूज पाहून त्रासला आहे. मुंबईतील एका दैनिकाच्या जेष्ठ पत्रकाराने या विषयावर जाम तोंडसूख घेतले आहे. त्यावर तुम्हाला काय वाटते, तुम्हीपण अगदी मोकळेपणाने आपले मत मांडू शकता.
———–
सुशांत सिंह प्रकरणात माध्यमांची अवस्था वारांगनांपेक्षा वाईट – एक पत्रकार
देशाचे राष्ट्रीय व प्रादेशिक टी. व्ही. चॅनेल्स, हे मुंबईचा फोरास रोड, पुण्याची बुधवार पेठ अन नागपूरच्या गंगाजमनातील वारांगनानांही लाजवतील एवढे ‘धंदेवाईक’ झाल्याचं, ‘सुशांत सिंग राजपूत’ प्रकरणावरून स्पष्ट होतंय. 125 कोटींच्या देशात, गेले 72 दिवस रोज एक प्रकरण 23 तास 52 मिनिटे चालविले जाते. याचा अर्थच असा की हे इलेक्ट्रॉनिक मिडियावाले ‘न्याय’ देण्याच्या नांवाखाली किंवा लोकशाहीचा ‘चौथा स्तंभ’ असल्याचं भासवून, अक्षरशः ‘बौद्धीक देहविक्री’ करताहेत.

अरे, भाडखावांनो, कोण हा सुशांत ? दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे सारखे पाच विचारवंत मरून पाचपेक्षा अधिक वर्षे लोटली. त्यांच्यासाठी एवढा गळा काढला असता तर या देशाचे ‘खरे क्रिमिनल’ उजेडात तरी आले असते. एक टिपनाट अ‍ॅक्टर, ज्याचे चार दोन चित्रपट आलेत. मिळालेल्या पैशात तो पोरी फिरवून मोकळा झाला. काहींनी त्याचे बँक अकौंट खालीही केले. त्याची आत्महत्या की हत्या, त्यासाठी आता सीबीआय उतरली ना मैदानात ? मग टी. व्ही.वाले एवढा घसा का कोरडा करताहेत ? कुणाकडुन तुम्हाला भाड मिळत आहे ?

ब्रेकींग न्यूज… सीबीआय अधिकारी, सुशांतच्या गच्चीवर गेले. ब्रेकींग न्यूज… तपास अधिकारी चावी बनविणार्‍याच्या दारात. ज्यूसवाल्याची चौकशी होणार. स्ट्रेचर 5 फुट 11 इंच होते. सुशांतची उंची 5 फुट 10 इंच होती. इतके लहान स्ट्रेचर आणले कसे ? आत्ताच बातमी हाती आली, सुशांतचे लोणावळ्यात फार्म हाउस होते. तिथे तो विश्रांती घेत असतानाच रिया चक्रवर्तीचा फोन वाजला. ब्रेकींग न्यूज… महेश भट्ट, वय 72, रियाचे व महेश भट्टचे नेमके ‘लफडे’ काय ? पहा ‘दंगल’मध्ये !

72 दिवस या सुपारी बहाद्दर, नीच टी. व्ही. पत्रकार – अँकर मंडळींनी डोक्याचं भजं केलंय. अरे, हरामखोरांनो, रोज शेतकरी आत्महत्या करतोय, पावसामुळे – पुरामुळे लाखो घरे वाहून गेली, बरबाद झाली. मुलं-महिला उघड्यावर आली. करोडो हेक्टर जमीन नापीक झाली. पेट्रोल 90 रु. लिटर झाले. जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद होतात. तरुण लाखोंच्या संख्येने बेरोजगार होतात. कोरोनाचा आकडा 70 लाखाच्या वर गेला. 42 हजार मेले. ते या भाडखाऊ दलालांना दिसत नाही का ? अरे टीआरपीच्या नावाखाली किती विकले जाणार आहात ? हातात रिमोट घेतला की, सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, मुंबई पोलिसांवर संशय, ठाकरे घराण्यावर शिंतोडे, सीबीआयची तपास यंत्रणा, रिया-महेश भट्टची लफडी, सुशांतची चड्डी बदलणार्‍या मॅनेजरची चौकशी. अरे काय चाललंय हे ? असं वाटतं, तो अर्णव गोस्वामी, रोहित सरदाना, देवगण किंवा त्या तोंडावर बाजरीचं पीठ थापून आलेल्या लेडी अँकर दिसल्या तरी, शेण फेकून मारावेसे वाटते. मला ‘विष्ठा’ म्हणायचे होते. न्यायधिश असल्याच्या थाटात प्रश्न विचारता आणि तेच निर्णय देतात. भाडखावांची भाषा कशी असते. दर्पणकारांच्या भाषा शैलीची वाट लावुन टाखली आहे. ह्या दल्ल्यांनी.
लोकशाहीत पत्रकारांना चौथा स्तंभ मानलं गेलंय. याचा अर्थ हे सुपारीबहाद्दर सुप्रिम कोर्टाचे जज झाले का ? देशाचे राष्ट्रपती समजतात का ? संविधानप्रमुख असल्यागत वागतात ? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य भलेही दिले असेल, परंतु एवढं आक्रमण ? झटपट 50 बातम्यांपैकी 39 बातम्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या ?

समजा उद्या गुन्हेगार पकडला, त्याला फाशी झाली, देश बुडणार आहे का ? तो राजपूत स्वर्गातून परत येणार आहे का ? तुम्ही कुत्र्यासारखे भुंकले म्हणून तुम्हाला ‘भारतरत्न’ मिळणार आहे का ? त्यासाठी कायदा, पोलीस ‘व्यवस्था’ आहे ना ? रोज काय घडलं त्यासाठी 15 मिनिटे जरूर खर्च करा ना ? 23 तास 52 मिनिटे आणि तेही 72 दिवस ?

फोरास रोड, बुधवार पेठ, गंगाजमनाच्या वारांगना परवडल्या. बिचार्‍या पैसे घेऊन चादरी तरी बदलतात. हे राष्ट्रीय व प्रादेशिक चॅनेलवाले चादरीही बदलण्याच्या लायकीचे नाहीत. रोज तीच चादर (बातमी) उलटी-पलटी करून वेगवेगळ्या ग्राहकांसाठी (टी.व्ही. प्रेक्षक) वापरतात. हीच खरी चौथ्या स्तंभाची शोकांतिका आहे. अरे, पत्रकार आहात की भाडखाऊ ? अँकर आहात की दलाल ? एवढी चाटुगिरी ? किती चाटायचं यालाही काही मर्यादा आहेत. एका आत्महत्येला किंवा तथाकथित हत्येला किती महत्व द्यायचं ?

मित्रांनो, माझी लिखाणाची अशी परंपरा – शैली नाही. परंतु संतापाचा कडेलोट झाला. म्हणून या पिसाळलेल्या कुत्र्यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देण्याचा हा प्रयत्न.