सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

0
385
मुंबई, दि.३ (पीसीबी) – सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात छळाबाबत पीडित सूनेकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित (पीडितेचा नवरा) दुसरा मुलगा आनंद (पीडितेचा दीर) आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरीही मुलगी झाल्याने चव्हाण कुटुंबीय सूनेचा छळ करत होते. पीडितेला याआधीच मुलगी होती. त्यात दुसरीही मुलगी झाल्याने घरच्यांकडून माझा अधिकच छळ होऊ लागला, असे पीडित सूनेने तक्रारीत सांगितल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात १६ जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. फिर्यादीच्या तक्रारीची दखल घेत सूनेचा छळ केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.