‘सुधीर मुनगंटीवार यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याची इच्छा – अशोक चव्हाण

0
453

नांदेड, दि.३० (पीसीबी) – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुनगंटीवार यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘सुधीर मुनगंटीवार यांना मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याची इच्छा आहे’ असा टोला ;अशोक चव्हाण यांनी लगावला.

नांदेडमध्ये एका विवाहसोहळ्याला मुनगंटीवार उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. 

पुढे बोलताना म्हणाले की, ‘सुधीर मुनगंटीवार यांच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही. आमचं तीन पक्षाचं सरकार स्थापन झालंय आहे. आमचे चांगले चाललंय. मुनगंटीवारांना वाटते तसे काही होण्याची सुतराम शक्यता नाही. तिन्ही पक्षाचं सरकार महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काम करतंय’ असं मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.