सासू-सास-यांना वाचवण्यासाठी गेलेल्या जावयावरच जीवघेणा हल्ला

0
257

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – सासू आणि सास-याला चारजण मिळून मारहाण करत होते. त्यामुळे त्यांची भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या जावयाला मारहाण करणा-या चौघांनी विळा आणि कु-हाडीने मारून जखमी केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या जावयाच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना 24 जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता एच ए मैदान, पिंपरी येथे घडली.

रावसाहेब आण्णा काकडे, साहेबराव आण्णा काकडे, रामदास भीमा काकडे, लखन भीमा काकडे (सर्व रा. एच ए मैदान, रसरंग चौक, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बाबासाहेब रामदास गायकवाड (वय 23, रा. बराड वस्ती, ता. आंबेगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 24) दुपारी पाच वाजताच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी यांचे सासरे दगडू आण्णा काकडे आणि सासू सिंधूबाई दगडू काकडे यांना मारहाण करत होते. त्यामुळे फिर्यादी त्यांचे भांडण सोडिवण्यासाठी मध्ये पडले. त्याचा राग आल्याने आरोपी रावसाहेब काकडे याने विळ्याने मारून गायकवाड यांना जखमी केले.

त्यानंतर रामदास काकडे याने कुहाडीने गायकवाड यांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. गायकवाड यांनी हाताने कु-हाड अडवली. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आरोपींनी गायकवाड यांच्या दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.