सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाड्याचे चित्र हटवण्याची मागणी

0
870

सातारा, दि. ३ (पीसीबी) –  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाड्याचे छायाचित्र काढून टाकण्यात यावे, अशी मागणी सत्यशोधक ओबीसी संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, मुक्तीवादी संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, सत्यशोधक विद्यार्थी संघटनांनी  आज (गुरूवार) येथे केली.   

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त  सत्यशोधक ओबीसी संघटना, सम्यक विद्यार्थी आंदोलन, मुक्तीवादी संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, छात्र भारती, कलासंगिनी, मुक्ती संघर्ष समिती  या संघटनांच्या प्रतिनिधींनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाजवळ  एकत्र येऊन अभिवादन केले.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाड्याचे छायाचित्र  काढून टाकण्याची   मागणी करत गीत सादर केले.  विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाड्याचे छायाचित्र काढून टाकून त्याठिकाणी सावित्रीबाई फुले यांची मुद्रा असलेले नवे बोधचिन्ह स्वीकारावे, असे सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राज्यसंघटक सचिन माळी, कलासंगिनीच्या शीतल साठे यांनी सांगितले.

माळी म्हणाले की, शनिवारवाडा हे बोधचिन्ह गुलामगिरीचे प्रतिक आहे. शनिवारवाडा आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. रयतेवर जुलूम करणारी पेशवाई ही मनुस्मृतीचे  दंडसंहिता आदर्श मानून कारभार करत होती. त्यामुळे शनिवारवाडा हे बोधचिन्हातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.