राज ठाकरेंनी ‘चला हवा येऊ द्या’ बघायला हरकत नाही; आशिष शेलारांचा टोला

0
1107

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळ घालवण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ बघायला हरकत नाही, अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष  शेलार यांनी  ट्वीट करून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘लोकांच्या प्रश्नांपेक्षा “मी”पणा जोपासण्यात जे धन्यता मानतात, त्यांना प्रथम राष्ट्र! मग पक्ष !आणि शेवटी मी !!अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मुलाखती समजण थोड अवघडच असणार! वेळ असल्यामुळे कार्टून काढत..चला हवा येऊ द्या..बघायला हरकत नाही! आमच्या शुभेच्छा!!’ अशा शब्दांत शेलार यांनी राज ठाकरे यांना  टोला  लगावला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच एका वृत्तसंस्थेने मुलाखत घेतली. यावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदींना टोला लगावला आहे.  या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी बोला काय विचारु ? असे विचारत असल्याचे दाखवले आहे. एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असल्याचे म्हणत राज यांनी मुलाखतीचे सर्व वातावरण मोदीमय दाखवले आहे.