सावधान ! देशात कोरोना सुसाट; गेल्या चार दिवसात तब्बल ११,५७१ कोरोना पाॅझिटीव

0
544

पुणे, दि. ०४ (पीसीबी) : भारतात कोरोनाचा सुसाट वेगाने वाढत चालला आहे. काल दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात भारतात ३,९३२ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढ झाली आहेत. कालच्या दिवसात झालेली वाढ हि आत्तापर्यंतची एकाच दिवसात होणारी सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या चार दिवसात ११,५७१ ने कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. देशभरात एकुण बाधितांची संख्या ४६,४३७ इतकी झाली आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर मागील ४ – ५ दिवसांपासून स्पेन व इटली मध्ये कोरोना बाधीतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.

केंद्र शासनाने लाॅकडाऊन – ३ ची घोषणा करताना रेड, ॲारेंज, ग्रीन व कन्टेंनमेंट झोन मध्ये वर्गीकरण केले व लाॅकडाऊनच्या अटीमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली. परंतु मे महीना सुरु होताच देशात कोरोनाचा कहर अधिकच वाढु लागला आहे. गेल्या चार दिवसात देशात ११,५७१ ने कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. काल देशभरात दारु विक्री खुली करताच लाखोंच्या संख्येने तळीराम दारु खरेदीसाठी रस्त्यावर उतरले. ४० दिवस पाळलेव्या सोशल डिस्टंसिंगची पार वाट लागली.
काल दिवसभरात कोरोनामुळे तब्बल १७५ लोकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत मृत्यु झालेल्यांची संख्या १,५६६ इतकी झाली आहे.