सावधान! चोरटे लढवतायत चोरी करण्याची ‘हि’ अजब शक्कल

0
340

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : जुना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर एका कार चालकाला मारहाण करून लुटल्याची घटना घडली. कार घसल्याच्या कारणावरून सोमवारी (दि. 15) सायंकाळी हा प्रकार घडला.

राजेंद्र भीमराव तिडके (वय 35, रा. केळगाव रोड, आळंदी) यांनी शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 43 / बी एच 1718 या क्रमांकाच्या कार चालक अन्य त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. ते पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून कार घेऊन जात असताना उर्से टोलनाका येथे त्यांची कार आरोपींच्या कारला घासली. त्यावरून टोलनाक्याच्या पुढे काही अंतरावर आरोपींनी फिर्यादी यांची कार अडवली. फिर्यादी यांना हाताने मारहाण करून शर्ट फाडला. एक मोबाईल फोन आणि 15 हजारांची रोख रक्कम असा एकूण 22 हजारांचा मुद्देमाल आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.