सावधान… ओएलएक्स वरील साहित्य खरेदीतून अशी लूट

0
192

हिंजवडी,दि.१४(पीसीबी) – ओएलएक्स वरील साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने दोघांनी तरुणीसोबत संपर्क केला. पैसे देण्यासाठी क्यू आर कोड पाठवून तो स्कॅन करायला लावून त्याद्वारे तरुणीच्या बँक खात्यातून तीन लाख ५२ हजार ९९९ रुपये काढून फसवणूक केली. ही घटना ४ ते ५ डिसेंबर रोजी जांभुकरनगर, हिंजवडी येथे घडली.

हेप्सिभा मोहन चोप्पला (वय ३०, रा. जांभुकरनगर, हिंजवडी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर सक्सेना (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि ७०९९४६७१३३ या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्याच्या घरातील टेबल आणि खुर्च्या विकण्यासाठी ओएलएक्स या वेबसाईटवर जाहिरात दिली होती. त्याआधारे आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. फिर्यादी यांना विश्वासात घेऊन टेबल आणि खुर्ची खरेदी करण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्याने क्यू आर कोड पाठवला. फिर्यादी यांना तो क्यू आर कोड स्कॅन करायला लावून त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून तीन लाख ५२ हजार ९९९ रुपये ट्रान्स्फर करून घेत फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.