सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; तब्बल ‘एवढ्या’ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त

0
279

वाल्हेकरवाडी, दि. २२ (पीसीबी) – वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील एका किराणा मालाच्या दुकानात प्रतिबंधित गुटखा आढळला. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी दोन लाख 43 हजारांचा गुटखा जप्त करत दुकानदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 21) दुपारी सव्वापाच वाजता करण्यात आली.

भवरलाल नारायणलाल चौधरी (वय 45, रा. वाल्हेकवरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक महेश बारकुले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भवरलाल याचे वाल्हेकरवाडी येथील एका चौकात किराणा मालाचे दुकान आहे. त्याने दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य गुटखा ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गुरुवारी दुपारी सव्वापाच वाजताच्या सुमारास दुकानावर छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी दुकानातून दोन लाख 43 हजार 149 रुपयांचा विमल पान मसाला गुटखा, 17 हजार 845 रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 60 हजार 994 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.