सातवीत शिकणारा हा मुलगा पर्यटकांना इंग्लिश बोलून ‘असं’ गाईड करतो जे भल्या-भल्यांना जमणार नाही…व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

0
476

पीसीबी,दि.१० – अनेकदा आपल्या भारतातील विविध संस्कृती आणि रहस्यमयी इतिहास जाणून घेण्यासाठी अनेक पर्यटक परराष्ट्रातून आपल्या देशात येत असतात. भारतातील इतिहास किंवा एखाद्या पर्यटन स्थळी भेट दिल्यानंतर पर्यटकांना त्या स्थळांबद्दलची माहिती आणि इतिहास जाणून घ्यायचा असतो.

काही पर्यटक त्यांच्या सोबत एखादा गाईड घेऊन येतात आणि तो त्यांना सर्व माहिती त्यांच्या भाषेत समजावून सांगतो. पण काही पर्यटकांना स्वतः सोबत गाईड आणणे शक्य होत नाही तेव्हा ते स्थानिक गाईडची मदत घेतात. अश्याच एका गाईडची व्हिडिओ सोसिअल मीडिया वर चांगलीच व्हायरल झालीये.

काही परराष्ट्रीय पर्यटकांनी या छोट्या गाईडची माहिती देतानाची व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट केली आणि ती व्हिडिओ आपल्या देशात खूप व्हायरल सुद्धा झाली. सरकारी शाळेत सातवीत शिकणारा हा छोटा मुलगा हा खूप सुंदर इंग्लिश बोलून तेथे येणाऱ्या पर्यटकांना गाईड करत असतो.

एवढीश्या वयात इंग्रजी भाषेवर इतकं सुंदर प्रभुत्व पाहून सारेच थक्क होतात आणि हा व्हिडिओ शेअर करतात. त्यामुळे हा व्हिडिओ सोसिअल मीडियावर चांगलाच गाजला होता.