जगातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या ‘गुगल’भाऊ बद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

0
543

‘गुगल’ असं म्हंटल कि, आपल्या समोर येतो तो सगळ्या माहितीचा ‘खजाना’. कारण, इथे सगळं काही मिळत. त्यामुळे गुगल हे आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग तर आहेच, पण काहीही शंका असली की, त्याबद्दल उत्तर देणारा मार्गदर्शक देखील आहे. कोणती माहिती भेटली नाही कि, आपण म्हणतो ‘गुगल बाबा झिंदाबाद’ कारण तिथून माहिती मिळणार हि खात्री आपल्याला असते. पण यासाठी एक गोष्ट खूप महत्वही आहे जसे कि, माणसाला जगण्यासाठी हवा आवश्यक आहे त्यासाठी गुगल वापरण्यासाठी इंटरनेट गरजेचंच आहे.

गुगल हि एक अशी कंपनी आहे जिच्या जीवावर संपूर्ण जग चालत. या कंपनीने संपूर्ण जगभर आपले जाळं असं पसरवलं आहे कि, ५ सेकंद जरी गुगलची साईट स्लो झाली, तरी गुगलला कोट्यवधींचा फटका बसतो. तर संपूर्ण जग चालवणार्या या कंपनीमध्ये भरपूर लोक काम करतात. मात्र गुगल नक्की कस आहे? गुगल कसा नफा मिळवती आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना गुगल काय सोयी सुविधा देत माहितीये? तर आज जाणून घेऊयात या सगळ्या माहितीविषयी…ऑगस्ट १९९८ मध्ये, सन मायक्रोसिस्टिम कंपनीचे सहसंस्थापक अँडी बॅचतोलशॅयम यांनी लॅरी आणि सर्गी यांना एक लाख डॉलर इतकी रक्कम दिली. तेव्हा गुगल कंपनी या दोघांनी मिळून स्थापन केली. ई-मेलसोबत गुगलने सोशल मीडियात जबरदस्त मुसंडी मारली आहे. त्यामुळे या कंपनीने २०२० पर्यंत तब्बल १२ कोटी ९० लाख पुस्तके स्कॅन करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. सौदी अरबच्या वाळवंटामध्ये स्ट्रीट व्ह्यूच्या शूटिंगसाठी गुगलने भाड्याने उंट घेऊन त्याच्या पाठीवर कॅमेरे बसवले होते. अवघड काम सोप्पे करण्यासाठी ही पद्धत अवलंबण्यात आली. कदाचित तुम्हाला माहिती नाही पण ‘आय अँम फिलिंग लकी’ हे बटण देण्यासाठी गुगलला दरवर्षी तब्बल ६८२ कोटी इतकी रक्कम मोजावी लागते. कारण, यात जाहिरात न पाहता युजरला थेट रिझल्ट मिळतो.आपल्याला हे कळल्यावर विश्वास बसणार नाही पण, दर मिनिटाला गुगलच्या सर्च इंजिनवर जवळपास २० लाख गोष्टी सर्च केल्या जातात. २४ तासांत १६ टक्के अशा गोष्टी सर्च केल्या जातात. ज्या यापूर्वी कधीही गुगलमध्ये सर्च केल्या नव्हत्या. लॅरी आणि सर्गी यांनी मिळून १९९६ मध्ये इंटरनेटवर सर्च इंजिन तयार केले. ‘बॅकरब’ हे नाव आधी होते. मात्र नंतर १९९७ मध्ये कंपनीला गुगल डॉट कॉम डोमेन मिळाले. जेव्हा दिवसेंदिवस गुगल आपलं जाळ जगभर यशस्वी पणे पसरवत होता तेव्हा गुगलचा जगांवरील परिणाम थांबवण्यासाठी मायक्रोसॉफ्टने युजर्सना बिंग वापरण्यासाठी काही रक्कम देण्याच गाजर दाखवलं होत. मात्र, गुगलच्या युजर्सवर याचा काहीच परिणाम झाला नाही.तुम्हाला माहितीये कि, जर गुगलमधील काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला पुढील १० वर्षे अर्धा पगार गुगल देते. शिवाय त्या कर्मचाऱ्याच्या मुलांना एक हजार डॉलर इतकी रक्कम तो १९ वर्षांचा होईपर्यंत दिली जाते. ‘आमची कुठेही शाखा नाही’ हे आपण कंपन्यांच्या जाहिराती किंवा इतर ठिकाणी ऐकतो. पण गुगल मात्र या जाहीरातीला अपवाद आहे. कारण, गुगल हे ४० पेक्षा जास्त देशांमध्ये ७० कार्यालये चालवते. गुगलकडून दररोज १०० कोटीपेक्षा जास्त सर्च रिक्वेस्ट हाताळल्या जातात. या जवळपास १० लाख संगणकामधून पाठवण्यात येतात. गुगल हे जून २००० मध्ये जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन बनले होते. आणि या जागेकर ते आजही टिकून आहे.

तुम्हाला माहित आहे का? की गुगलकडे ऑनलाइन असलेल्या व्यक्तीचे वर्तन विश्लेषण करण्याची आणि ते ट्रॅक करण्याची क्षमता आहे. तुम्ही कोणत्या साईट्सवर जात आहात आणि कोणत्या जाहिरातींवर क्लिक करत आहात, याबद्दलची माहिती गुगल त्यांच्या जाहिरातदारांना देते. गुगल फक्त १,२ नव्हे तर जवळपास ८८ भाषा गुगल होम पेजवर वापरल्या जाऊ शकतात. गुगलने अॅपल आयफोनला स्पर्धक म्हणून स्वतःचा मोबाईल फोन काढण्याची योजना २००७ मध्ये आखली. या प्रकल्पाला ‘अँड्रॉइड’ नाव देण्यात आले, जी आज मोबईलची ऑपरेटिंग सिस्टम आहे. त्यांच्या टीमने १००० पेक्षा जास्त डुडल्स तयार केले आहेत. गुगलच्या या टीमला ‘डुडलर्स’ असे म्हटले जाते. हे सर्वच खूप प्रतिभावान इलूस्ट्रेटर आहेत, जे गुगलच्या होमपेजवर येणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवतात. गुगलने पहिले डुडल १९९९ मध्ये तयार केले होते.आपण जर गुगलने दिलेल्या सेवांमधील सर्व कोड जोडले, म्हणजेच जिमेल, गुगल डॉक्स आणि युट्युब या सर्वांचे कोड जोडले, तर आपल्याला त्यामध्ये २०० कोटी कोडच्या ओळी आणि जवळपास ८६ टेराबाईट फाइल्स मिळतील. गुगलने १.६५ बिलियन डॉलर्सला युट्यूबला २००६ मध्ये विकत घेतले होते. युट्यूब आज जगतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय असलेली वेबसाईट आहे. युट्यूबवर प्रत्येक मिनिटाला तब्बल ३०० तासांपेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड होतात, असे गुगलच्या लक्षात आले आहे. गुगल स्ट्रीट व्ह्यूव हे खूपच प्रभावशाली वाटते. याच्या मदतीने आपण त्या जागी खरच गेलोय का ? असा भास होतो. काही वर्षांपूर्वी गुगलने १९४ देशांमधील २८ मिलियन मैल रस्ते गुगल मॅप्सने यशस्वीरीत्या व्यापले होते. या सर्वांचा जवळपास २० पेटबाइट्स डेटा या गुगल मॅप्सचा गुगलकडे आहे. मोटोरोला मोबिलिटीला गुगलने १२.५ बिलियन डॉलर्सना २०११ मध्ये विकत घेतले होते आणि तेच २०१७ मध्ये २.९१ बिलियन डॉलर्सना विकले होते. गुगल हे साखळी साखळीने पैसे कमावते हे स्पष्टपणे दिसून येते. कारण, गुगलचा ९९ टक्के नफा हा फक्त जाहिरातींमधून येतो. मग बाकी माध्यमातून मिळणाऱ्या नफ्याचा अंदाज आपण लावूच शकतो. त्यामुळे गुगल हि जगातील सर्वात श्रीमंत कंपनी आहे हे आपल्याला मानावच लागेल.