सांगितलेलं ऐकलं असतं तर आबा आज आपल्यात असते – अजित पवार

0
592

पुणे,दि.९(पीसीबी) – सांगितलेलं ऐकलं असतं तर आबा आज आपल्यात असते, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बारामतीत आज कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अजित पवार बोलत होते.

आर. आर. पाटील यांनी सांगितलेलं ऐकलं असतं तर ते आज आपल्यात असते, असं सांगत अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांची आठवण काढली.

आर.आर. पाटील ब्रीच कॅन्डीमध्ये दाखल झाले. डॉक्टरांनी आर. आर. पाटील यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर पवारसाहेबांना मी याची माहिती दिली. मी देखील आर. आर. पाटील यांना भेटलो, तेव्हा आर. आर. पाटील यांनी हातात हात घेतला आणि दादा, तुमचं दहा वर्षापूर्वी ऐकलं असतं, तर ही अवस्था झाली नसती असं आर. आर पाटलांनी त्यावेळी म्हटल्याचं अजित पवारांनी सांगितलं.