सांगवी परिसरात दहशत माजवण्यासाठी कोयत्याने वाहनांची तोडफोड

0
616

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – परिसरात दहशत माजवण्यासाठी तीन जणांच्या टोळक्यांनी कोयता आणि फरशीने कार आणि दुचाकीची तोडफोड केली. तसेच एका महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवार (दि.२२) रात्री अकराच्या सुमारास जुनी सांगवी ढोरेनगर, कणसे चाळीत घडली.

याप्रकरणी ६४ वर्षीय वृध्द महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार रात्री अकराच्या सुमारास जुनी सांगवी ढोरेनगर येथील कणसे चाळीत अचानक तीन अनोळखी इसम शिरले. त्यांनी परिसरात दहशत माजवण्यासाठी हातातील कोयता आणि फरशीने तेथे उभा असलेली स्कॉरपिओ कार आणि एका दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच एका महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.