सांगवीत दुचाकीच्या धडकेत वृध्दाचा मृत्यू

0
507

चिंचवड, दि. ७ (पीसीबी) – रस्ता ओलांडणाऱ्या एका ७८ वर्षीय वृध्दाचा दुचाकीस्वाराने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.५) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास सांगवी विशालनगर येथील बायकर झोन गॅरेजजवळील डीपी रस्त्यावर घडली.

वासुदेव महादेव आपटे (वय ७८, रा. श्री गुरुकृपा बंगला, सर्वे नं.२४ बी/१/२, हिंद चौक, विशालनगर) असे मृत्य वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या सुनेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, करीझ्मा दुचाकी (क्र. एमएच/१४/सीएफ/१२३२) वरील अज्ञात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास वासुदेव हे सांगवी विशालनगर येथील बायकर झोन गॅरेजजवळील डीपी रस्ता ओलांडत होते. यावेळी भरधाव करीझ्मा दुचाकी (क्र. एमएच/१४/सीएफ/१२३२) वरील अज्ञात चालकाने वासुदेव यांना जोरदार धडक दिली. यामध्ये वासुदेव यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर आरोपी दुचाकीचालक दुचाकीसह पसार झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात दुचाकीचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.