सांगवीत उसने देलेले पैसे परत न केल्याने नातेवाईकावरच केले कोयत्याने वार

0
714

चिंचवड, दि. ३१ (पीसीबी) – उसने देलेले ३० हजार रुपये आणि काही कौंटुबिक वादातून एका तरुणाने आपल्या नात्यातील एकावर कोयत्याने प्राणघात वार केले. ही घटना शनिवारी (दि.३०) रात्री साडेबाराच्या सुमारास जुनी सांगवी, शिंदेनगर येथील शिवपार्वती अपार्टमेंटसमोर घडली.

राजेश टारझन कुलकर्णी (रा. फ्लॅट क्र.१०, शिवपार्वती अपार्टमेंट, शिंदेनगर, जुनी सांगवी) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी वर्षा राजेश कुलकर्णी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजु रघु बंगेरा (वय २६, रा. मधुबन सोसायटी, लेन नं. ०५, जुनी सांगवी) या तरुणाविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी वर्षा आणि जखमी राजेश हे पती-पत्नी आहेत. तर आरोपी राजु हा वर्षा यांचा मावस दिर आहे. काही दिवसांपूर्वी राजेश यांनी राजु यांच्याकडून ३० हजर रुपये उसने घेतले होते. बरेच दिवस उलटून गेल्याने त्यांच्यात सारखा वाद होत होता. तसेच काही कौटुंबिक कारणावरुनही त्यांच्या वाद सुरु होता. याचा राग मनात धरुन आरोपी राजु हा शनिवारी रात्री राजेश यांच्या घरी गेला. आणि त्याच्याजवळील कोयत्याने राजेश यांच्या डोक्यात, हातावर आणि मानेवार प्राणघातक वार केले. या घटनेत राजेश गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आरोपी राजु याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे अधिक तपास करत आहेत.