राहुल गांधी अमेठी आणि वायनाडमधून लोकसभा लढवणार

0
541

नवी दिल्ली, दि. ३१(पीसीबी) –  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढवणार आहेत. ते  अमेठीसह केरळच्या वायनाड मतदारसंघातून  निवडणूक लढवतील, असे  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅन्थोनी यांनी  आज (रविवार) सांगितले. राहुल गांधी अमेठीसह  वायनाडमधून  लढणार असल्याची चर्चा  गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

अमेठी मतदारसंघाशी गांधी कुटुंबाचे कौटुंबिक  नाते आहे. अमेठीला राहुल त्यांची कर्मभूमी मानतात. त्यामुळे अमेठीपासून ते दूर होणे अशक्य आहे. त्यामुळेच त्यांनी अमेठीसह केरळमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी  पत्रकार परिषदेत सांगितले.

राहुल यांनी आपल्याच राज्यातून निवडणूक लढवावी, अशी दक्षिण भारतातील तिन्ही प्रदेशातून मागणी करण्यात आली होती. मात्र आम्ही त्यातून केरळच्या वायनाडची निवड केली. कारण हा लोकसभा मतदारसंघ तिन्ही प्रांताना जोडलेला आहे, असेही सुरजेवाला यांनी  सांगितले.