सर्वोच्च निकाल : वादग्रस्त जागा हिंदुंना, मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय

0
508

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद खटला प्रकरणी आज अंतिम निर्णयाचे वाचन केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रंजन गोगाई यांचे खंडपीठ सकाळी साडेदहा वाजल्यापासून या खटल्याल्याच्या निर्णयाचे वाचन करीत आहेत.

तीन दशकांपासून रामजन्मभूमी वादामुळे देशात अनेक राजकीय चढउतार झाले. अनेक दशकांनंतर अखेर या प्रकरणावर अंतिम निकाल लागणार आहे. १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी झाल्यानंतर किमान तीन आठवडे या प्रकरणाबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गोगोई यांनी स्पष्ट केले होते.

मशीद रिकाम्या जागी बांधली नव्हती. मशिदीखाली मोठी रचना होती असे न्यायालयाने मान्य केले आहे. शिया वक्फ बोर्डाचा दावा एकमताने फेटाळला. गोगोई म्हणाले, ‘आम्ही १९४६ च्या फैजाबाद न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची सिंगल लीव पिटीशन फेटाळत आहोत’ असे न्यायालयाने म्हटले आहे.

वादग्रस्त जागा हिंदुंना, मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. वादग्रस्त जागेत १८५६-५७ पर्यंत याठिकाणी नमाज पढण्यात आला नव्हता. त्यापूर्वी याठिकाणी हिंदूकडून पूजा केली जात होती. या जागेवर दावा सांगणारा कोणताही पुरावा सुन्नी वक्फ बोर्डाला सादर करता आला नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.