सरकारी बँकाचे कामकाज पाच दिवस बंद

0
357

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – साप्ताहिक सुट्ट्या, सार्वजनिक सुट्टी व कर्मचारी-अधिकाऱ्यांचा संप यामुळे सरकारी बँकांचे कामकाज आज, शुक्रवारपासून (सोमवारचा अपवाद वगळता) सलग पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. आज, शुक्रवारी अखिल भारतीय बँक अधिकारी महासंघाने प्रदीर्घ वेतन सुधार मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारला आहे. तर, २६ तारखेला बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना संपावर जाणार आहेत. यामुळे बँक व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे.