‘समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे’: सचिन साठे

0
192

‘निरपेक्षपणे काम करणाऱ्यांना काँग्रेसमध्ये न्याय मिळतो’: सचिन साठे

पिंपरी, दि.12(पीसीबी) :  न्याय व्यवस्थेवरील विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अन्यायग्रस्त पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी लीगल सेलने काम करावे असे आवाहन काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. तसेच काँग्रेस पक्षात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय मिळतो असेही सचिन साठे म्हणाले.

रविवारी (दि.12) आकुर्डी येथे शहर काँग्रेसच्या लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे बोलत होते.

यावेळी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष गिरीजा कुदळे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, मयूर जयस्वाल, मकरध्वज यादव, प्रतिभा कांबळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, विशाल कसबे; चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे आदी उपस्थित होते.

यावेळी शहर काँग्रेसच्या लीगल सेलच्या उपाध्यक्ष पदावर ॲड. विभा नरेंद्र सिंह, ॲड. रामचंद्र बंकट कळसाइत, सरचिटणीस पदावर ॲड. संकल्पा रघुनाथ वाघमारे, चिटणीस पदावर ॲड. विकास नागरे, ॲड. शुभांगी विनोद थोरात आणि सदस्य म्हणून ॲड. अनुजा सुधाकर कांबळे यांची नियक्ती करण्यात आली.

यावेळी साठे यांनी सांगितले की, भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे. घटनातज्ञ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेचे पालन आपण सर्व करतो. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना देवदूत प्रमाणे न्याय मिळवून देण्याचे काम वकील बंधू, भगिनी करीत असतात. जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास आणखी दृढ होण्यासाठी वकिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. अशा वकिलांचा सन्मान करीत त्यांना लीगल सेलचे व्यासपीठ काँग्रेसने दिले आहे. त्याचा त्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपयोग होईल. महिलांवरील अत्याचारांच्या घटना, कौटुंबिक हिंसाचार, गुंडगिरी, आर्थिक तसेच सायबर क्राईमला बळी ठरलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम वकील बंधू भगिनी यांनी करावे असेही साठे म्हणाले.

प्रास्ताविक काँगेस लीगल सेलचे शहर अध्यक्ष ॲड. अनिरुद्ध कांबळे, सूत्र संचालन गौरव चौधरी, आभार मकरद्वज यादव यांनी मानले.