‘सदैव अटल’ स्मृतीस्थळी अटल बिहारी वाजपेयींना दिग्गजांचा सलाम, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली.

0
336

नवी दिल्ली, दि.२५ (पीसीबी) – – देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील त्यांच्या ‘सदैव अटल’ या स्मृतीस्थळावर जाऊन सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले.

यावेळी  गृहमंत्री अमित शाह, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डासोबतच अनेक नेत्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कुटुंबातील सदस्यही येथे उपस्थित होते. भजन गायक अनूप जलोटा यांच्याकडून श्रद्धांजली सभेत भजन गाऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.