सचिनभाऊ अहिर युवा फौंडेशन तर्फे गरजुंना एक हात मदतीचा …

0
568

विश्नांतवाडी,दि.३(पीसीबी) – कामगार नेते सागर पोखरकर व कामगार नेते इम्रान शेख यांनी सचिन भाऊ आहिर युवा फौंडेशन तर्फे अन्नधान्य व दररोज 500 गरजूना मोफत अन्नदान लाँग डाऊन झाल्या पासून वाटण्याचा संकल्प कामगार नेते सागर पोखरकर यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे शिवाजी काळे,साई कुमार निकम , शाहरुख नाईकनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली साधला. सदर कलवड, श्नमिक नगर, शांतीनगर,कळस, विश्नांतवाडी, येरवडा भागातील काही माथाडी व बांधकाम मजूर, बेघर व गौर गरिब झोपडपट्टीतील गरजुंना दररोज अन्नदान करण्यात येत आहे.

तसेच विश्रांतवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पो.निरिक्षक अरुण आहवाड ,वरिष्ठ पो.निरीक्षक( गुन्हे) रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका तर्फे बेघर व परगावचे मजूर जे पळून जातात अशाना पकडून पुणे महापालिकेच्या शाळां मध्ये त्यांची राहण्याची सोय केली आहे. अशा बेघर व मजूरांना सामाजिक बांधिल्की जपत वाढदिवसाचे औपचारिक साधून त्यांना फुल ना फुलाची पाकळी, एक हाथ मदतीचा या संपल्पनेतून कपडे, मास्क व सँनिटायझर वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी महापालिकेचे संजय घावटे, शशिकांत साटोटे व ईतर उपस्तित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सोनू जैसवाल,नासीर शेख, प्रशांत पोखरकर, नितीन बर्गे, अश्विन अग्रवाल, अजय कुरणे, स्वप्निल पोखरकर, यांनी परिश्नम घेतले.
तसेच गौर गरिबांना सढळ हाताने मदत करण्याचे आवाहान माथाडी कामगार नेते सागर पोखरकर व कामगार नेते ईम्रान शेख यांनी केले आहे.