देशात कोरोनाचा प्रकोप वाढतोय; काल दिवसभरात २,८०६ कोरोना पाॅझिटीव

0
538

पुणे, दि. ०४ (पीसीबी) : भारतात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात २,८०६ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढ झाली आहेत. दि. २ मे राजी २,३९१, दि. ३ मे ला २४४६ रुग्ण आढळले होते. कालच्या दिवसात झालेली वाढ हि आत्तापर्यंतची एकाच दिवसात होणारी सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या तीन दिवसात ७,६३९ ने कोरोना रुग्णांची वाढ झाली असून देशभरात एकुण बाधितांची संख्या ४२,५०५ झाली आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर मागील दोन तीन दिवसांमध्ये अचानकपणे रशियात मोठ्याप्रमाणात कोरोनाचे संक्रमण होऊ लागले आहे. रशिया मध्ये काल १०,६३३ रुणांची वाढ झाली आहे.

मे महीना सुरु होताच देशात कोरोनाचा कहर अधिकच वाढु लागला आहे. केंद्र शासनाने लाॅकडाऊन – ३ ची घोषणा करताना रेड, ॲारेंज, ग्रीन व कन्टेंनमेंट झोन मध्ये वर्गीकरण केले व
लाॅकडाऊनच्या अटीमध्ये काही प्रमाणात शिथीलता आणली. परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या एका प्रकारे मोठ्या संकटाचे संकेत देत आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांची संख्या १,३९१ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९४७ ने वाढली आहे. आतापर्यंत देशभरात ११,७७५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.