“संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षामध्ये लढा देणाऱ्या, रक्त सांडणाऱ्यांना मानाचा मुजरा”

0
425

मुंबई,दि.१(पीसीबी) – संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षामध्ये लढा देणाऱ्या, रक्त सांडणाऱ्यांना मानाचा मुजरा, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणून हुतात्म्यांना वंदन करताना मनात आलेल्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून मुंबई मिळवली आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक वर्षांची आहे. बलिदान दिल्यानंतर महाराष्ट्राला मुंबई मिळाली, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्र दिन धुमधडाक्यात साजरा करण्याचं आधी ठरवलं होतं, पण आता नाईलाज आहे, आजही मी तोंडावर मास्क लावून अभिवादन केलं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.