संपूर्ण पुणे शहराचा गुरूवारी पाणीपुरवठा बंद  

0
1257

पुणे, दि. २७ (पीसीबी) – संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी (दि.२९) खंडित केला जाणार आहे. त्याचबरोबर शुक्रवारीही ( दि.३०) बहुतांश भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा  केला जाणार आहे, असे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने  प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे विद्युत/ पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. तसेच महावितरणच्या नवीन पाचशे एमएलडी प्लान्टसाठी नवीन वीज पुरवठ्याचे कामही करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने म्हटले आहे.