कुत्र्याने घेतलेल्या चाव्यामुळे नऊ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

0
613

औरंगाबाद, दि. २७ (पीसीबी) – कुत्र्याने घेतलेल्या जबरदस्त चाव्यामुळे गंभीर जखमी झालेल्या एका नऊ वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२२) चिमुकल्याला कुत्र्याने चावा घेतला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचा आज (मंगळवार) रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

नूरमोजम खालेद पिंजारी (वय ९, रा. बारूदगर नाला परिसर, औरंगाबाद) असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे  नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी औरंगाबाद शहरातील बारूदगर नाला परिसरात राहणारा नऊ वर्षीय नूरमोजम घराजवळ खेळत होता. यावेळी एका मोकाट कुत्र्याने नूरमोजम याला जबरदस्त चावा घेतला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.