संपूर्ण देश सैन्यदलाच्या पाठीशी – शरद पवार

0
632

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – पाक व्याप्त काश्मीरमधून (पीओके) चालणाऱ्या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय वायूसेनेला सलाम आहे. संपूर्ण देश या कारवाईच्या आणि सैन्यदलाच्या पाठीशी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले की, सैन्यदलाला अशावेळी पूर्ण स्वातंत्र्य द्यावेच लागते. योग्य वेळ, योग्य ठिकाण याची खात्री झाल्यानंतर त्यावर कृती केली पाहिजे. त्यासाठी पुन्हा केंद्र सरकारला विनंती करा,  असे प्रकार नसतात. यापूर्वीही सैन्यदलाला अशा प्रकारचे स्वातंत्र्य होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकारने आज ( मंगळवारी)  सांयकाळी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. याबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मला फोन आला होता. परंतु, मुंबई विमानतळ आज दिवसभरासाठी बंद आहे. याबाबत  स्वराज यांना सांगितले, असेही पवारांनी सांगितले.