संत तुकाराम महाराज पालखी वारीची बस निगडीत थांबवा; अन्यथा लोटांगण आंदोलन

0
499

भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी व इशारा

निगडी, दि.२१(पीसीबी) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची संत तुकाराम महाराजांची आषाढी वारी यंदाही बसमधुनच होणार असल्याने ही वारीची बस निगडीत पंधरा मिनिटे दर्शनासाठी थांबविण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या वर्षीही संत तुकाराम महाराजांची पालखी वारी बसमधुन मोजक्या प्रमुख लोकांच्या उपस्थितीतच देहुतुन पंढरपूरला नेण्यात येणार आहे, पण निगडीत पिंपरी चिंचवड शहरातील भाविक या पालखीचे जोरदार स्वागत करत दर्शन व सेवाकार्य करत असतात, कित्येक वर्षापासुन चालत आलेल्या या परंपरेला खंड न पडता यावर्षीही ही वारीची बस निगडीत पंधरा मिनिटासाठी दर्शनासाठी थांबविण्यात यावी अशी सर्वांची इच्छा आहे, तरी निगडीत ही बस थांबवुन नियमांचे पालन करत काही वेळ पालखीच्या दर्शनासाठी खुले करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे, पालखी न थांबविल्यास भक्ती शक्ती समुहशिल्प चौकात या वारीच्या बससमोर लोटांगण घालुन आंदोलन करणार असल्याचा इशारा काळभोर यांनी यावेळी दिला आहे.