संतापजणक: चाकणमध्ये मतिमंद तरुणीला अज्ञाताने केले गर्भवती; डिलेवरी दरम्यान तरुणीसह बाळाचा मृत्यू

0
305

चाकण, दि. १० (पीसीबी) – मतिमंद असल्याचा फायदा घेत अज्ञाताने २३ वर्षीय तरुणीसोबत शरीर संबंध ठेवून तिला गर्भवती केले. गर्भवती असल्याचे समजताच तरुणीच्या घरच्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तरुणीने मृत बाळाला जन्म दिला आणि काही दिवसांनी तिचाही मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना चाकण येथील पाईट माळवाडीची ठाकर वस्ती येथे घडली.