शेजारी न बसायला राहुल गांधी काय पाकिस्तानचे आहेत का? – नितीन गडकरी

0
1695

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – शेजारी न बसायला राहुल गांधी काय पाकिस्तानचे आहेत का? आणि आपण तर पाकिस्तानशीही चर्चा करतोच की’, मग आम्ही शेजारी बसलो म्हणून काय फरक पडला, असा सवाल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी राजपथावर नितीन गडकरी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शेजारी – शेजारी बसले होते.  यावेळी गडकरी आणि राहुल यांच्यामध्ये  गप्पा सुरू होत्या.  त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.  तर अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. यावर गडकरी यांनी आज (शनिवार)  एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खुलासा केला.

यावेळी ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी केल्या जाणाऱ्या आसनव्यवस्थेत माझ्या शेजारची खुर्ची काँग्रेस अध्यक्षांची असते. त्यामुळे पूर्वी त्या खुर्चीवर  सोनिया गांधी बसत होत्या. यावेळी राहुल गांधी बसले होते. समोरून अनेक चित्ररथ जात होते. आम्ही दोघे अधून-मधून एकमेकांशी या चित्रपरथांबद्दल चर्चा करत होतो.  मग, आम्ही शेजारी बसलो म्हणून काय फरक पडला, असे ते म्हणाले.