शेअर बाजार सुरु होताना मोठी घसरण झाली, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण

0
431

मुंबई, दि. १९ (पीसीबी) : गेल्या काही दिवसांपातून जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यपूर्ण घसरण होत असताना सोमवार आणि मंगळवारी शेअर बाजार हिरव्या रंगात बंद झाला होता, मात्र काल पुन्हा शेअर बाजारात घसरण झाली होती. आज घसरणीचं हेच सत्र कायम राहिले. आज शेअर बाजार सुरु होताना मोठी घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स 1,138.23 अंकांनी घसरून 53070.30 वर सुरु झाला, तर निफ्टी 322.9 अंकांनी घसरून 15917.40 वर सुरु झाला.

दोन दिवसांच्या वाढीनंतर, बुधवारी बाजार हलक्या लाल चिन्हात बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 109.94 अंकांनी म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 54,208.53 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 19.00 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी घसरून 16,240.30 वर बंद झाला.

फार्मा आणि एफएमसीजी शेअर्समुळे दुपारपर्यंत देशांतर्गत बाजारात चांगली मजबूती होती असे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. इंग्लंडमध्ये किरकोळ महागाईची वाढती आकडेवारी आणि फेडच्या अध्यक्षांकडून महागाई कमी करण्याचे आश्वासन यामुळे बाजारातील भावना खराब झाली. पुढे जाऊन जागतिक मध्यवर्ती बँकांकडून व्याजदरात झालेली वाढ पाहायला मिळू शकते.