शिवस्मारक दुर्घटना; शिवसेनेने केले राज्य सरकारवर गंभीर आरोप   

0
827

मुंबई, दि. २५ (पीसीबी) –  अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमादरम्यान बुधवारी (दि.२४) झालेल्या अपघातावरुन शिवसेनेने भाजपवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. पायाभरणी कार्यक्रमाच्या दरम्यान सरकार कुठे होते? असा सवाल करून या कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत ढिसाळ केल्याची टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.  तर कार्यक्रमाचे घाईत नियोजन करून लोकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  केली आहे.

पायाभरणी कार्यक्रमादरम्यान सरकार नेमके कुठे होते ? असा सवाल करून ज्यांनी नियोजन केले, ते अत्यंत ढिसाळ होते. तिथे जाण्यासाठी जी बोट निवडली ती फायबर होती. त्यात २४ लोक होते, आणि केवळ ५ ते ६ लाइफ जॅकेट होते. मग सुरक्षा व्यवस्था कुठे होती ? कशासाठी आपण हे करतोय? ह्यात सुद्धा राजकारण आहे का ? क्रेडिट साठी आपण हे करतोय का? असा सवाल सावंत यांनी यावेळी उपस्थित केला.

गुजरातमधील वल्लभभाई पटेल यांचा पुतळा करणारेच  शिवस्मारकाचा पुतळा तयार करणार आहेत. याचे अखेरचे फिनिशिंगचे काम सुरु आहे. मग हा कार्यक्रम आटोपण्याची  इतकी घाई का करण्यात आली, असेही सावंत म्हणाले. सरकारने या दुर्घटनेची चौकशी केली पाहिजे, असे सावंत म्हणाले.