शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याने निलेश राणेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात मानहानीचा गुन्हा

0
2444

वाकड, दि. १ (पीसीबी) – माजी खासदार निलेश राणे यांनी वारंवार त्यांच्या भाषणात शिवसैनिकांबद्दल आक्षेपार्हय विधान केल्याने. तसेच शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याने गोंदिया जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख युवराज भगवान दाखले यांनी वाकड पोलीस ठाण्यात निलेश राणे विरोधात तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार, वाकड पोलिसांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्या विरोधात कलम ५०० अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.

मागील काही दिवसांपासून निलेश राणे यांनी वारंवार आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आनंद दिगे यांच्यासह शिवसैनिकांवर आक्षेपार्हय विधान केले आहेत. गुरुवारी देखील निलेश राणे यांनी, “मातोश्री च्या कुठल्या माळ्यावर काय चालते हे मला माहित आहे, तसेच शिवसैनिक हे हिजडे आहेत”, असे विधान केले. यामुळे युवराज दाखले यांनी आपल्या भावना दुखावल्याचे सांगून वाकड पोलीस ठाण्यात निलेश राणे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी निलेश राणे विरोधात कलम ५०० अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.